News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

प्रिंट व डिजिटल मार्केटिंग काळाची गरज : धनंजय जामदार

प्रिंट व डिजिटल मार्केटिंग काळाची गरज : धनंजय जामदार



बारामती: प्रतिनिधी
अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत असताना आपले उत्पादन घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रिंट व डिजिटल मार्केटिंग म्हतपूर्ण असून ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले
बारामती एमआयडीसी मधील 
फ्युजन इन्फिनिटी सोल्युशनच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पहिल्या पॉडकास्ट स्टुडिओचे उदघाटन धनंजय जामदार यांच्या हस्ते झाले या प्रसंगी 
पुणे मधील आयव्हीएफ बिजनेस कन्सल्टंट डॉ. मधुर हमीने , अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज बारामतीच्या असिस्टंट प्रोफेसर डॉ. स्मिता खत्री ,फ्युजन इन्फिनिटी सोल्युशन्स चे डायरेक्टर किरण पवार, आकाश रामगिर ,उद्योजक हरिश्चंद्र खाडे, महादेव गायकवाड व इतर मान्यवर उपस्तीत होते.
प्रॉडक्ट लॉन्चिंग, सर्विसेस ची माहिती, जीवन आधारित इंटरव्यू, कंटेंटिव्ह इंटरव्यू, व्यवसायिक यशोगाथा या सर्वांसाठीच पॉडकास्ट चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी अनेकांना पुणे-मुंबई या ठिकाणी जावे लागत असे. आता बारामती मध्येच अत्याधुनिक पॉडकास्ट स्टुडिओ तयार झाल्याने बारामतीकरांना ही एक नवीन संधी मिळणार असल्याचे संचालक किरण पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रिंट व डिजिटल मार्केटिंग मधील गुणवंत कर्मचारी व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर ओहोळ यांनी केले तर आभार प्रदर्शन भूषण पवार यांनी केले.

चौकट : 
उदघाटन करताना फिट न कापता लॅपटॉप वरील बटन क्लिक करताच फित ऑटोमॅटिक कापली जाते हे पाहून डिजिटल क्रांतीचा प्रत्यय व अत्याधुनिक तंत्रज्ञान किती पुढे आहे यांचे उदाहरण पाहता आले.

फोटो ओळ: उद्घाटन करत असताना धनंजय जामदार,किरण पवार व उद्योजक 
---------------------

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment