News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांची धडाकेबाज कारवाई..! टिपर चोरीच्या २ गुन्हेगारांना २४ तासात अटक

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांची धडाकेबाज कारवाई..! टिपर चोरीच्या २ गुन्हेगारांना २४ तासात अटक



बारामती 

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मौजे वडगाव निंबाळकर ता. बारामती जि.पुणे गावचे हददीतील गालींदे यांचे पेट्रोल पंपातील मोकळे जागेतुन दि.१९ रोजी रात्रौ ११:३० ते २० रोजी सकाळी ०७:०० वा चे दरम्यान फिर्यादी लालासाहेब पंडीतराव दरेकर रा वडगाव निंबाळकर ता बारामती यांनी त्यांचे मालकीचा टिपर टाटा कंपनीचा १६१८ एल.पी. के हायवा ट्रक में एम.एच. १७ बी. वाय. ६२९६ हा चोरी झोलेलबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला होता.

 सदर गुनहयाचे तपासात गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे चोरीस गेलेले टीपरचा शोध घेतला असता सदरचा टिपर हा मौजे सालपे ता. फलटण जि. सातारा गावचे हददीत पाठलाग करून पकडला असुन सदर टिपर सोबत इसम नामे १) निलेश विठठल भंडलकर रा. चोपडज पर्णकुटी ता. बारामती जि. पुणे, २) नामदेव तानाजी चव्हाण रा. चव्हाणवाडी ता फलटण जि. सातारा हे दोघे मिळून आलेवर त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर टिपर चोरी केलेचे कबुल केले आहे. तरी सदर गुन्हयाचे कामी इसम नागे १) निलेश विठठल भंडलकर रा. चोपडज पर्णकुटी ता. बारामती जि. पुणे, २) नामदेव तानाजी चव्हाण रा. चव्हाणवाडी ता फलटण जि. सातारा यांना अटक केली आहे.

सदरची कामगिरी ही पंकज देशमुख , पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण,रामशे चोपड अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, राठोड सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोसई पांडुरंग कन्हेरे, महेश पन्हाळे, अनिल खेडकर, पो. ना भाउसो मारकड, कुडलीक कडवळे, पोपट नाळे, हृदयनाथ देवकर, नागनाथ परगे यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा महेश पन्हाळे हे करीत आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment