News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अजितदादा युथ फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

अजितदादा युथ फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

रक्तदान ही चळवळ व्हावी:  जय पवार



बारामती :प्रतिनिधी
कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता प्रत्येकाला जीवनात महत्वाच्या क्षणी गरज असणारे  रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे रक्तदान ही चळवळ व्हावी अशी अपेक्षा युवा नेते जय अजित पवार यांनी व्यक्त केली.
अजितदादा युथ फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्याच्या उद्घाटन प्रसंगी जय पवार बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, कारेगाव च्या सरपंच निर्मला नवले, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा अनिता गायकवाड, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रा अजिनाथ चौधर उपाध्यक्ष प्रताप पागळे,पुणे जिल्हा पोलीस मित्र संघटना अध्यशा शुभांगी चौधर, वंजारवाडी चे सरपंच जगन्नाथ वनवे,जैनकवाडीचे सरपंच संदीप शेंडे, उद्योजक प्रा शशिकांत चौधर, श्रीनाथ वॉटर सप्लाय चे चेअरमन सुभाष चौधर,संतोष राजमाने, रणजित भोसले, सचिन अहिर, बी एम भोसले, सर्जेराव काळे , सेवादल चे मा. अध्यक्ष सुजित जाधव आदी मान्यवर उपस्तीत होते.
 गेल्या १३ वर्षी पासून  रक्तदान शिबिर आयोजित करून ३ हजार बाटल्या रक्त संकलित केले जाते व वर्षभरात केव्हाही राज्यात कोणालाही रक्ताची गरज पडल्यास त्यास त्या गटाचे रक्त ताबडतोक मिळण्यासाठी यंत्रणा राबविली जाते त्यामुळे अपघात ,शस्त्रक्रिया आदी वेळी रक्त उपलब्ध झाल्याने अनेकांचे प्राण वाचविले जात असल्याचे  अजितदादा युथ फौंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी सांगितले.
या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तर रक्तदात्यास सन्मानपत्र  देऊन जय पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उपस्तितांचे स्वागत उपाध्यक्ष दत्ता माने,  राहुल चौधर,,सचिव सचिन घाडगे, खजिनदार अरविंद काळे यांनी केले.रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला .सूत्रसंचालन श्री सावळेपाटील  यांनी केले तर आभार प्रा. शशिकांत चौधर यांनी मानले.
चौकट: 
कार्यक्रम चालू असताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे  मोबाईलवरून मनोगत व्यक्त केले व  माईक च्या माध्यमातून उपस्तितांना  एकविण्यात आले.
रायगड जिल्ह्यात पाऊस व पूर आल्याने रक्तदान शिबिरास येऊ शकल्या नाहीत परंतु अजित दादा युथ फाऊंडेशनच्या कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ: 
उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना जय पवार व व्यासपीठावर मान्यवर

-----------------/

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment