News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

वाढदिवसानिमित्त ज्येष्ठाची मोफत दाढी कटिंग

वाढदिवसानिमित्त ज्येष्ठाची मोफत दाढी कटिंग


बारामती: प्रतिनिधी 
बारामती शहरातील तांदळवाडी या ठिकाणी असलेल्या बोरावके वृद्धाश्रमामध्ये रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोफत दाढी व कटिंग करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आकाश पगारे या कारागीर युवकांनी' केसांची स्वछता व डोक्यातील केसांना आजार होऊ नये ' या विषयी मोफत मार्गदर्शन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या पाच वर्षा पासून  ए. बी .सलून चे संचालक आकाश पगारे, भूषण पगारे यांनी हा  उपक्रम सुरू केला आहे .
२३ जुलै  रोजी उपक्रम सुरू करताना युवा नेते जय अजित पवार, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जय पाटील, किरण कारंडे,  बोरावके वृद्धाश्रमाचे सचिव किशोर मेहता, खजिनदार फकरूशेठ बोहरी, सहखजिनदार अमित बोरावके विश्वस्त डॉ अजिंक्य राजे निंबाळकर डॉ, सुरेंद्र भोईटे वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक किरण शेळके आदी मान्यवर उपस्तीत होते.
सुर्यनगरी  मध्ये बी. ए सलून  अँड टॅटूज च्या माध्यमातून व्यवसाय करताना विविध आजारामुळे किंवा वृद्ध अवस्थेमुळे सलून मध्ये ज्येष्ठ नागरिक येऊ शकत नाही म्हणून त्यांच्याच घरी जाऊन व्यवसाय करताना सदर कल्पना सुचली व उपक्रम सुरू केला 
सदर उपक्रम मोफत दोन दिवस चालतो सामाजिक बांधिलकी जोपासत सदर उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवित असतो या माध्यमातून ज्येष्ठाची सेवा करण्याचे भाग्य लाभते.  वाढदिवसानिमित्त बुके, हार, तुरे ,फ्लेक्स, आदींवर खर्च न करता मोफत दाढी कटिंग चा उपक्रम राबवित अजित पवार यांना शुभेच्छा देतो व आत्मिक समाधान मिळत असल्याचे आकाश पगारे यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी जोपासत ,उत्तम व आदर्शवत उपक्रम आहे ज्येष्ठ नागरिक समाधान व्यक्त करतात  हेच या उपक्रमाचे फलित असल्याचे जय पवार यांनी सांगितले.

फोटो ओळ:
 बोरावके वृद्धाश्रम या ठिकाणी ज्येष्ठांची मोफत दाढी कटिंग उपक्रम राबविताना आकाश पगारे व सोबत जय पवार व इतर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment