News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामती मध्ये टेनिस क्रिकेट पंच परीक्षा उत्साहात संपन्न बारामती प्रतिनिधी

बारामती मध्ये टेनिस क्रिकेट पंच परीक्षा उत्साहात संपन्न बारामती प्रतिनिधी



टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षा बारामती मध्ये रविवार दि १४ जुलै रोजी संपन्न झाली.
 या वेळी पुणे ग्रामीण मधून वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शकांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडियाचे सचिव मीनाक्षी गिरी या उपस्थित होत्या .तसेच टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे सहसचिव चंद्रकांत वर्णे व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे गुणलेखक संदीप पाटील तसेच टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण अध्यक्ष आशिष डोईफोडे हे उपस्थित होते तसेच टेनिस क्रिकेट असो पुणे ग्रामीण सचिव नंदा सातपुते ही उपस्थित होत्या या पंच परीक्षेमध्ये वेगवेगळ्या शाळेच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता तसेच या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन सोमनाथ भोसले यांनी केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या खेळासाठी सहकार्य व्हावं व त्यांना हक्काचे मैदान प्राप्त व्हावं त्याचप्रमाणे विविध स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी व ग्रामीण भागातून पंच तयार व्हावेत म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्ष आशिष डोईफोडे यांनी सांगितले .


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment