मौजे कटफळ येथे लाभार्थ्यांना साहित्य वाटप
बारामती:प्रतिनिधी
मौजे कटफळ येथे केंद्र शासनाच्या भाकृअनुप , राष्ट्रीय अजैविक स्टैस प्रबंधन संस्थान यांचेमार्फत अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत कटफळ मधील अनुसुचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप केले आहे. यामध्ये लाभार्थ्यांना पिठगिरणी, सायकल, शिलाई मशिन, भांडी साहित्य व शेतीउपयोगी साहित्याचे गावातील १०० लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप केले गेले.
यावेळी मुख्य अधिकारी डाॅ नितीन कुराडे यांनी या संस्थेमार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या व महिलांना बचत गटामार्फत व्यवसाय करण्यासाठी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले,
यावेळी सरपंच विजय कांबळे, उपसरपंच संध्याराणी झगडे, सदस्य डाॅ संजय मोकाशी, संग्रामसिंह मोकाशी, तात्याराम रांधवण, पुनम कांबळे, संध्या मोरे सिमा मदने ग्रामसेवक अतुल गरगडे, बबन कांबळे व ICAR चे मुख्य अधिकारी डॉ नितीन कुराडे साहेब, मुख्य तकनिकी अधिकारी डॉ अविनाश निर्मळे साहेब, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ भास्कर गायकवाड साहेब, अकाऊंट ऑफिसर डॉ दास साहेब, प्रशासकीय अधिकारी दयानंद खरात साहेब,रोनित कदम,आदित्य वाघमारे, अजय कांबळे उपस्थित होते.
Post a Comment