News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

काकडे महाविद्यालयात 'मेरी माटी मेरा देश अभियान' हा कार्यक्रम संपन्न

काकडे महाविद्यालयात 'मेरी माटी मेरा देश अभियान' हा कार्यक्रम संपन्न


सोमेश्वरनगर - मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ, ग्रामपंचायत वाघळवाडी व सैनिक कल्याण संघ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेरी माटी मेरा देश अभियान' हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर होते. तसेच या अभियानाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख समन्वयक  राजेशजी पांडे, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.सतीशराव काकडे- देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक आर.एन.शिंदे, डॉ. सदानंद भोसले पुणे जिल्हा आयोजन समिती अध्यक्षा बागेश्वरी मंठाळकर, विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य प्राचार्य नितीन घोरपडे,  सागर वैद्य, संदीप पालवे सिनेट मेंबर श्री. प्रसन्नजीत फडणवीस,पाखरे, डॉ. सुनील लोखंडे तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे-देशमुख, वाघळवाडी गावचे सरपंच अॅड. हेमंत गायकवाड, सैनिक कल्याण संघ बारामती अध्यक्ष श्री.प्रशांत शेंडकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव श्री. सतीशराव लकडे व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना मेरी माटी मेरा देश या अभियानाची शपथ देण्यात आली.
        यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपण हा भारत सुजलाम सुफलाम बघत आहोत, त्यासाठी काही लोकांनी बलिदान, आहुती दिली आहे, त्याग केला आहे, त्याची कुठेतरी जाणीव व्हावी या उद्देशानेच 'मेरी माटी मेरा देश' या अभियानाची संकल्पना देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून ती पुढे आली व "ही माती बलिदानाची आहे, ही माती त्यागाची आहे. ही माती माणसाची जाणीव जागृती करणारी आहे" असे विचार मांडले. 
         तसेच या अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. राजेशजी पांडे म्हणाले "देशाच्या पंतप्रधानांनी जे स्वप्न पाहिले आहे की, या देशाची माती ही त्यागाची, समर्पणाची, स्वाभिमानाचे आहे, आणि त्या मातीचा मान संपूर्ण भारतीयांनी राखला पाहिजे." 140 कोटी भारतीय जनतेच्या सहभागातून गोळा झालेल्या मातीतून दिल्ली येथे अमृतवाटिका तयार होणार आहे आणि तेथे साडेसात हजार वृक्षांचे वन तयार केले जाणार आहे असे विचार या अभियानाबद्दल त्यांनी मांडले आणि शेवटी 'मातीला नमन वीरांना वंदन' ही संकल्पना आपण रुजवली पाहिजे असे विचार मांडले आहे. 
      अध्यक्षीय मनोगता मध्ये महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. सतीशराव काकडे- देशमुख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या अभियानाची तालुक्यातून आम्हाला आयोजनाची संधी दिल्याबद्दल आभार मानले व महाविद्यालयाच्या पन्नास वर्षाचा थोडक्यात आढावा घेतला. 
      तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी केले यावेळी त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून, उपस्थित तेरा महाविद्यालयाचे सर्व समन्वयक व विद्यार्थी उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करून या अभियानाबद्दल आपले विचार व्यक्त केले. 
       यावेळी या आयोजनाचे जिल्हा समन्वयक बागेश्वरी मंठाळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठ कार्यक्रम अधिकारी डॉ.सदानंद भोसले, सैनिक कल्याण संघाचे  अध्यक्ष श्री.प्रशांत शेंडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सैनिक, तालुक्यातील अन्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी तसेच विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक डॉ. जगन्नाथ साळवे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अच्युत शिंदे, डॉ. दत्तात्रय डुबल, प्रा. मेघा जगताप, आयक्युसीचे समन्वयक डॉ. संजू जाधव, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.जया कदम डॉ. प्रवीण ताटे- देशमुख,  कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. सौ. कल्याणी जगताप यांनी केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment