News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या अध्यक्ष पदी डॉ अशोक तांबे व सचिव पदी विश्वास शेळके

वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या अध्यक्ष पदी डॉ अशोक तांबे व सचिव पदी विश्वास शेळके


बारामती: प्रतिनिधी 
येथील वीर सावरकर स्वीमर्स  क्लबच्या अध्यक्षपदी डॉ अशोक तांबे उपाध्यक्षपदी चंद्रगुप्त वाघोलीकर व  सचिव पदी  विश्वास (नाना)  शेळके, खजिनदार मिलिंद अत्रे आणि  संचालक अमोल गावडे, बाळासाहेब टाटिया, अनिल सातव, दीपक बनकर, ऍड पंढरीनाथ नाळे, डॉ गीता होरा, कुमारी शर्मिष्ठा जाधव व  सल्लागार  पदी सदाशिव सातव ,जवाहर  वाघोलीकर, महेंद्र ओसवाल व माजी जिल्हा न्यायाधीश राजेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली.
सभासद व जलतरणपटू यांना उत्तम सेवा देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून ५ कोटी चा निधी मंजूर झाला असून  नवीन अद्यावत जलतरण तलाव  स्वतंत्र महिला व  पुरुष यांच्या साठी केला जाणार असून त्याचे  बांधकाम लवकरच सुरू केले जाणार असल्याचे डॉ अशोक तांबे यांनी सांगितले .
सभासद यांचे आरोग्य जलतरण च्या माध्यमातून उत्तम ठेवणे व अधिक अधिक नवीन अद्यावत सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सचिव विश्वास शेळके यांनी सांगितले 


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment