बारामतीतील अशोकनगर येथील गणेश मंदिरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठण
बारामती: प्रतिनिधी
मंगळवार २६ सप्टेंबर रोजी रोजी महाराष्ट्र एज्युकेशन
सोसायटीच्या सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेतील
विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त बारामती येथील अशोक नगरच्या बागेतील गणपती मंदिरात जाऊन अथर्वशीर्ष पठण केले . इयत्ता ३ री व ४ थी चे ३०० विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता.
वरील उपक्रमासाठी शाळेने संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष व शालासमिती अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, शाळेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने हा उपक्रम राबविला. बारामती नगरीच्या
नगराध्यक्षा मा. सौ. पौर्णिमाताई तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता
Post a Comment