बारामती मध्ये ऑल पुणे ग्रामीण पेंच्याक सिलाट स्पर्धा संपन्न
रविवार २४ सप्टेंबर रोजी ऑल पुणे ग्रामीण पेंच्याक सिलाट असोसिएशन बारामती मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या.
या प्रसंगी अक्षय थोरात, प्रवीण माने, अक्षय जगताप, मनोज भोसले, डॉ. संदीप कांबळे, अनिल पाटील , विद्या प्रतिष्ठान स्कुल च्या हिना चौधरी व प्रशिक्षक साहेबराव ओहोळ आदी मान्यवर उपस्तीत होते.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सेंट्रल स्पोर्टस् मिनिस्ट्री यांच्या गाईडलाईन नें पार पडली. या स्पर्धेत स्पर्धा संचालक म्हणून महाराष्ट्र पेंच्याक सिलाट असोसिएशन सदस्य अरविंद शिर्के यांनी काम पाहिले. स्पर्धेत २५गोल्ड,२०सिल्वर,१५ ब्रॉन्झ पदकची कमाई करून प्रथम क्रमांक बारामती संघाने पटकवला, द्वितीय क्रमांक भिगवण संघणे व त्रितिय क्रमांक दौंड संघाने मिळवला
१ व २ अक्टोम्बर कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत या खेळाडूंची निवड झाली
हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ आहे.
१ सप्टेंबर २०२० ला या खेळाला चा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी आपल्या राखीव नोकर भरती मध्ये केला आहे. या खेळाला युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड , ऑलम्पिक कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, भारतीय विश्वविद्यालय संघ अशा ऑफिशियल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो ऑल पुणे ग्रामीण ची स्थापना करून बारामती तालुक्यातील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती प्रशिक्षक साहेबराव ओहोळ यांनी दिली
Post a Comment