भोर व वेल्हे तालुक्यातील २१ गावातील विद्यार्थ्यांना सायबेजकडून दप्तर व शैक्षणिक साहित्यांचे वाटप
भोलावडे प्रतिनिधी - कुंदन झांजले
सायबेजआशा ट्रस्ट, पुणे २०१७ गाव दत्तक योजना अंतर्गत सायबेज या संस्थेने भोर व वेल्हे तालुक्यातील २१ गावे दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये हि संस्था ग्रामीण विकास कार्यक्रम, अद्यावत तंत्रज्ञान वापरून नाविन्यपूर्ण सुधारित पद्धतीने शेती तसेच शेतकरी, समाजपयोगी, लोकोपयोगी विकास कार्यक्रमे करत आहे . तसेच सायबेजआशा संस्था मागील ५ वर्षापासून गरीब, गरजू आणि अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या शाळेतील मुलांना शाळेय साहित्य आणि दप्तर वाटपाचा उपक्रम राबवत असते. याही वर्षी असाच शालेय शैक्षणिक साहित्य आणि दप्तर वाटप कार्यक्रम शनिवार (दि१ जुलै) भोर तालुक्यातील महुडे खोऱ्यातील नांद व वेळवंड खो-यातील बारे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आला. किवत,शिंद,नांद, महुडे ,बारे-खुर्द,बारे बुद्रुक, म्हाळवडी, कर्नवडी, पसुरे या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भोर तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, केंद्रप्रमुख प्रा.नाजिरकर , बलकवडे, सायबेजआशा संस्थेचे प्रतिनिधी प्रदीप दळवे, राकेश कांबळे, संस्थेचे ३० स्वयंसेवक ,सर्व गावच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन बारे बुद्रुक चे माजी सरपंच सोपान दानवले व खालचे नांद मधील सामाजिक कार्यकर्ते माऊली दुधाणे यांनी केले.नांदधील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांद शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कुचेकर यांनी केले.
Post a Comment