भोरला लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्त लावले पुन्हा लग्न
भोलावडे प्रतिनिधी - कुंदन झांजले
भोर शहरात वास्तव्यास शिक्षकी पेशा मध्ये कार्यरत असणारे दांपत्य म्हणजे अनंत मारुती कदम व मंगल अनंत कदम या दाम्पत्यांनी लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त वाघजाई माता मंदिर येथे पुन्हा लग्न केले व समाजात पुढे सुखी संसाराची पंचवीस वर्षे यशस्वी झाल्याचे जीवंत उदाहरण दिले.
आजच्या विज्ञान व मोबाईलच्या युगात लग्न झालेही कळत नाहीत आणि मोडलेलीही समजत नाहीत परंतु कदम दाम्पत्यांनी संसारात रुजलेली जीवनाची यशस्वी २५ वर्षे पार करीत आपले संसारमय जीवन २५ वर्षे यशस्वी करत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. अनंत मारुती कदम हे प्राध्यापक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित आहेत तर त्यांच्या पत्नी देखील गुणवंत शिक्षिका आहेत.
Post a Comment