News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामती व इंदापूर तालुक्यातील ३४ गावातील पोलिस पाटील आरक्षण सोडत जाहीर

बारामती व इंदापूर तालुक्यातील ३४ गावातील पोलिस पाटील आरक्षण सोडत जाहीर

बारामती दि. ३० :-
बारामती उपविभागातील बारामती व इंदापूर तालुक्यातील रिक्त असलेल्या ३४ गावातील पोलीस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीच्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नवीन प्रशासकीय भवनातील सभागृहात करण्यात आले.

या कार्यक्रमास तहसिलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, नायब तहसिलदार पी. डी. शिंदे, उपविभागीय व तहसिल कार्यालयातील कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यासमोर पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.

बारामती तालुका:
अनुसूचित जाती- सोनगाव, निंबुत (महिला) व शिर्सुफळ (महिला), अनुसूचित जमाती- आंबी बु, सि. निबोडी, जळगावसुपे (महिला), विमुक्त जाती अ- माळेगाव खुर्द, विशेष मागास प्रवर्ग- धुमाळवाडी, इतर मागास प्रवर्ग- वाणेवाडी, माळवाडी (लाटे) (महिला), देऊळवाडी, गाडीखेल, बजरंगवाडी (महिला), ईडब्ल्युएस प्रवर्ग- जळकेवाडी

इंदापूर तालुका:
अनुसूचित जाती- कळंब, अनुसूचित जमाती- निरगुडे, कालठण नं २, कुरवली, व्याहाळी, कुंभारगाव, अवसरी, सरडेवाडी (महिला), शहा(महिला), वरकुटे खु. (महिला), विमुक्त जाती अ- कौठाळी, भटक्या जमाती ब- निरनिमगाव, गोंदी, भटक्या जमाती ड- पवारवाडी (महिला), विशेष मागास प्रवर्ग- चव्हाणवाडी(महिला), इतर मागास प्रवर्ग- काझड, डाळज नं १(महिला), व जाधववाडी, ईडब्ल्युएस प्रवर्ग- भावडी व राजवडी.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment