व्ही आर बॉयलर ने गुणवत्ता व दर्जा राखला: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
बारामती:प्रतिनिधी
ग्राहकांच्या गरजेनुसार कंपनीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान मध्ये सतत बदल करणे व देशी आणि परदेशी कंपनी ग्राहकांच्या पसंतीस पडेल असे बॉयलर निर्माण करून गुणवत्ता आणि दर्जा राखणे हे फार महत्त्वपूर्ण काम व्ही. आर. बॉयलरने केलेले आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले
बारामती एमआयडीसी येथील व्ही आर बॉयलर कंपनी मध्ये
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बॉयलरचे पूजन करून
टांझनिया देशामध्ये प्रस्थान करण्यात आले.
याप्रसंगी दत्तात्रय भरणे यांनी मनोगत व्यक्त केले
या प्रसंगी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, महाराष्ट्र प्रदेश उद्योग आणि व्यापार सेलचे सरचिटणीस प्रवीण जगताप , घाडगे वाडीचे मा सरपंच राजकुमार शेडगे, उद्योजक भारत मोकाशी, हरीश कुंभारकर,अनिल कायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्राहकांना बॉयलर क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि पर्यावरण पूरक बॉयलर देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रास्तविक मध्ये व्ही आर बॉयलर चे चेअरमन राजाराम सातपुते यांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्रात भारतीय तंत्रज्ञानाचा ठसा जागतिक स्तरावर उमटविण्याच्या उद्देशाने केलेले उत्कृष्ट कार्य पाहून कृषिमंत्र्यांनी दिलेली शाबासकी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी
विवेक सातपुते यांनी सांगितले
सुत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले आभार प्रवीण जगताप यांनी मानले.
तरच शासन पाठीशी ....
पर्यावरणपूरक आणि प्रदूषण नियंत्रणास प्राधान्य देणाऱ्या बॉयलर निर्मितीची आवश्यकता अधोरेखित केली. कृषी अवशेष (Agro Waste), बायोमास तसेच महानगरपालिका कचरा (Municipal Waste) यांसारख्या पर्यायी इंधनांचा प्रभावी वापर करणारे बॉयलर विकसित करण्यावर भर देण्याचे त्यांनी सुचविले.
भविष्यात प्रदूषणाचे प्रमाण कमीत कमी ठेवण्यासाठी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचा अवलंब केला तरच राज्यातील उद्योगाच्या पाठीशी शासन राहील :
दत्तात्रय भरणे
कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य
Post a Comment