News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

क्रिकेट साठी बारामती चे सहकार्य कायमचेच : सचिन सातव

क्रिकेट साठी बारामती चे सहकार्य कायमचेच : सचिन सातव


पुणे जिल्ह्यातील पहिला टर्फ एरिया चा रुई मध्ये शुभारंभ 

बारामती:प्रतिनिधी 
स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सर्वच खेळाला नेहमीच प्राधान्य देत ग्रामीण खेळाडू साठी सर्व सुविधा बारामती मध्ये उपलब्ध करून दिल्या त्याच पद्धतीने क्रिकेट साठी बारामती करांचे सहकार्य कायमस्वरूपी राहील असे प्रतिपादन बारामती नगर परिषद चे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येथे अंडर १९ मध्ये खेळत असलेला बारामतीचा युवा क्रिकेटपटू अर्थव जाधव यांनी रुई येथे ए. जे. स्पोर्ट्स अरेंना टर्फ एरिया क्रिकेट व फुटबॉल साठी तयार केला त्याचा शुभारंभ प्रसंगी सचिन सातव बोलत होते.
या प्रसंगी नगरसेवक प्रवीण माने,गोरख पारसे, विष्णुपंत चौधर, अमर धुमाळ,नगरसेविका व उपगटनेत्या संपदा चौधर व मा. सरपंच मच्छिंद्र चौधर ,युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे,व राघू शेठ चौधर,नवनाथ चौधर प्रा अजिनाथ चौधर, धनंजय जामदार, शरद सूर्यवंशी ,लक्ष्मण मोरे ,राजेंद्र खराडे ,,हरीश कुंभरकर भारत मोकाशी ,संभाजीराव माने, भीमराव भोसले ,साईनाथ चौधर व एच. आर. एस. प्रोसेसिंग सिस्टिम चे व्हाईस प्रेसिडेंट जितेंद्र जाधव उपस्तीत होते.
ग्रामीण भागातील खेळाडूं,कामगार, विविध कंपन्या, महिला,फिटनेस क्लासेस यांना विविध शिफ्ट व वेळेनुसार स्लॉट मध्ये दिवसा व रात्री फुटबॉल व क्रिकेट खेळता यावे या साठी एकूण क्षेत्रफळ १२,५०० फुट असून 36 फूट उंच,३६० डिग्री मध्ये सदर मैदान तयार केले आहे ,त्याच प्रमाणे प्रेक्षक गॅलरी,स्वछता गृह व कॅन्टीन सुविधा मिळणार आहेत 
अल्पदरात उच्च प्रतीचा खेळण्याचा अनुभव मिळेल असा विश्वास युवा क्रिकेटपटू अर्थव जाधव यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले. आभार साईनाथ चौधर यांनी मानले.
चौकट: 
 ग्रामीण भागातील खेळाडू व इतर क्षेत्रातील क्रिकेट व फुटबॉल प्रेमींना दिवस व रात्री मैदान उपलब्ध करताना लोक वस्ती पासून दूर, संत तुकाराम महाराज पालखी मार्गालगत रुई येथे सदर टर्फ एरिया तयार केलेला आहे त्यामुळे सदर मैदान,प्रेक्षक यांचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे
जितेंद्र जाधव (अर्थव जाधव यांचे वडील, बारामती) 

फोटो ओळ: उदघाटन करताना सचिन सातव, सोबत अर्थव जाधव व जितेंद्र जाधव व इतर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment