नवरात्र निमित्त देवीची वेशभूषा ला तरुणीची पसंदी
अध्यात्मिक व सांस्कृतिक मिलाप मुळे भक्तिमय वातावरण
बारामती:
देशात नवरात्र उत्सव साजरा होताना बारामती येथील माळा वरची देवी मंदिर येथे भाविक दर्शनासाठी येत असताना विविध शाळा, कॉलेज,मेकअप स्टुडिओ, ब्युटी पार्लर मधील तरुणी देवीची वेशभूषा करून भाविकांचे लक्ष वेधत आहेत व त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे.
रविवार ११ सप्टेंबर रोजी घटस्थपणा झाली शाळा, महाविद्यालय यांना सुट्टीचा दिवस त्यामुळे काही मुलींनी देवीची वेशभूषा करून ग्रुप ने देवीचे दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्तीत होत्या.
हिरवी, किंवा पिवळी साडी, डोक्यावर मुकुट, कपाळावर मळवट, गळ्यात हार, दागिने व हातात त्रिशूल घेऊन 'आई उ दे अंबाबाई , आई राजा उदो उदो , कुलस्वामी चा जय हो , आदी घोषणा देत,त्याच प्रमाणे
सर्व मंगल मांडले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायण नमोस्तुते
आशा देवी स्तुत्ये गात वातावरण भक्ती मय करत असतात.
जीन्स, पँट किंवा सलवार कुडता घालण्यापेक्षा बदल म्हणून आणि श्रद्धा म्हणून सदर पेहेराव वेशभूषा केल्याचे बारामती येथील केतकी शेंडगे या युवतीने सांगितले.
देवीची वेशभूषा केल्यामुळे सुख प्राप्ती होते व देवीचे सेवा करण्याचे भाग्य मिळत असल्याचे अनिता वाघमोडे यांनी सांगितले.
देवीची वेशभूषा व मेकअप करताना आनंद व समाधान मिळत असते व नवीन पिढी ,तरुण मुली श्रद्धा म्हणून देवीची वेशभूषा करतात हे सांस्कृतिक व आध्यत्मिक कौतुकास्पद असल्याचे यशस्वी मेकअप स्टुडिओ (लडकत वाडी ,यवत ता. दौंड ) च्या संचालिका अनिता वाघमोडे यांनी सांगितले.
चौकट:
देवीच्या मंदिर समोर साक्षात देवी असल्याचा भास झाला. उत्कृष्ट व लाजवाब मेकअप मुळे मुलींनी सांस्कृतिक वारसा जपला :
सौ मनीषा शिर्के
भाविक बारामती
फोटो ओळ:
देवीच्या मेकअप मध्ये केतकी शेडगे व शेजारी मेकअप आर्टिस्ट अनिता वाघमोडे व इतर भाविक महिला
Post a Comment