News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

खो-खोच्या मैदानावर ज्ञानसागरची दमदार झेप; मुला-मुलींचे संघ उपविजेते!

खो-खोच्या मैदानावर ज्ञानसागरची दमदार झेप; मुला-मुलींचे संघ उपविजेते!



बारामती:प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शासकीय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघांनी उल्लेखनीय कामगिरी करत दुहेरी उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ, वेगवान हालचाली, अचूक डावपेच आणि जबरदस्त जिद्द दाखवत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन करत संघाने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत उपविजेतेपद संपादन केले.
याचबरोबर ज्ञानसागर गुरुकुलच्या १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघानेही संपूर्ण स्पर्धेत आत्मविश्वासपूर्ण आणि कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत मुलींच्या संघानेदेखील द्वितीय क्रमांक मिळवून तालुकास्तरीय उपविजेतेपद आपल्या नावावर केले.
 विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती, शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचे हे यशस्वी फलित मानले जात आहे.
ज्ञानसागर गुरुकुलच्या मुला-मुलींच्या दोन्ही संघांनी मिळविलेल्या या दुहेरी उपविजेतेपदामुळे संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा अधिक भक्कम झाली असून, आगामी स्पर्धांमध्येही विद्यार्थी यापेक्षा अधिक दमदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त
 संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सागर आटोळे यांनी व्यक्त केला.
मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, शिक्षकवृंद व पालकांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

फोटो ओळ: 
यशस्वी विद्यार्थी व सोबत संस्थेचे मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment