News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कामगारांचे वेतन करार वेळेत व्याहवे :पांडुरंग कचरे

कामगारांचे वेतन करार वेळेत व्याहवे :पांडुरंग कचरे



बारामती:प्रतिनिधी

श्रायबर डायनामिक्स डेअरीज प्रा. ली बारामती व कामगार संघटना यांचे मध्ये कामगारांची वेतनवाढ कराराची बोलणी गेली नऊ महिने चालू आहे.
 वेतनवाढ कराराची मुदत संपून दोन वर्षे झाली आहेत.
 चर्चे दरम्यान काही विषयवार एकमत झाले पण प्रमुख मागणी वर एकमत झाले नाही व अचानक व्यवस्थपणाने चर्चा बंद करून करार मा अप्पर आयुक्त याचेकडे समेट साठी वेळ काढू पणा करणे करिता दाखल केला आहे ही बाब चुकीची असून वेतन करार वेळेत व्याहवेत अशी मागणी 
श्रायबर डायनामिक्स डेअरीज प्रा. ली कर्मचारी संघटना संस्थापक पांडुरंग कचरे यांनी केली आहे.
या प्रसंगी अध्यक्ष, विजय सस्ते, सरचिटणीस, राजेंद्र कोळेकर व कामगार प्रतिनिधी व सदस्य उपस्तीत होते.
कंपनी मधील कामगारांनी कधी ही कंपनी चे उत्पादनात नासाडी करणे किंवा नुकसान करणे या सारखा विचार ही केला नाही तरी कामगारांवर खोटे आरोप करून पोलीस बाळाचा वापर करनेची धमकी देणेत येत आहे.
 याउलट व्यवस्थापन मुख्य उत्पादनात कंत्राटी कामगार व ट्रेनी कामगार यांना ठेऊन उत्पादनची गुणवत्ता खराब करत आहे.
अनेक कामगारांवर महिलांना आरोप करायला लावणे, कुप्पाम आंध्र प्रदेश व फाझलका पंजाब येथे बदली करणे सतत कामगारांना दहशती मध्ये ठेवणे चा प्रयत्न करीत आहेत.
 कंपनी ची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली असताना कामगारांना योग्य पगारवाढ द्यायची नाहो आणि काही ठराविक लोकां नाच च नफा वाटणी करणे असं व्यस्त प्रमाण ठेवणे या विरुद्ध आवाज उठवीला की लगेच युनियमचे प्रतिनिधी यांचेवर कारवाई करणे कामावरून काढून टाकणे बदली करणे असे दबावाचे दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत.
 बॉयलर इलेक्ट्रिक मेन्टेनन्स रेफ्रिजरेशन सारखे विभाग कंत्राटी करणे या सारखे कुटील डाव व्यवस्थापन करीत आहे.
 गेली अनेक वर्षे कंत्राटी कामगारांना बोनस न देणे मिनिमम् वेजेस न देणे यासारखे गंभीर प्रकरण चे विरुद्ध मा आयुक्त व न्यायालय यांचे दाद मागितले आहे.
कंपनी मधील अनेक अधिकारी सुद्धा कोणतेही नियम न पाळता अनेक लोक तोंड बघून काढून टाकत आहेत 
 कायम कामगारांना पगारवाढ न देणे विनाकारण बदली करणे, पोलीस बळाचा वापर करणेंची धमकी देणे,
 कंत्राटी कामगारांना मिनिमम वेजेस न देणे, बोनस न देणे,
मुख्य उत्पादनात कंत्राटी कामगार व ट्रेनी कामगार वापरून उत्पादनाची दर्जा खराब करणे 
अधिकारी वर्गाला देखील काही कारण नसताना कामावरुंन काढून टाकणे याविषयीं अनेक वेळा विनंती करून ही व्यवस्थापनाचे काही प्रतिनिधी आडमुठी भूमिका घेत आहे.

चौकट: अन्न त्याग आंदोलन 

 शांततेचे मार्गाने या सर्व बाबीचा निषेध म्हणून मंगळवार २० ऑक्टोबर दसरा दिवशी सर्व कामगार बंधू /भगिनी कामावर असताना जेवण न करनेचा निर्णय घेऊन अन्नत्याग आंदोलन चालू केले आहे 

फोटो ओळ: 
कामगारांना मार्गदर्शन करताना पांडुरंग कचरे व इतर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment