चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची अविष्कार झोनल स्पर्धेसाठी निवड
बारामती:प्रतिनिधी
कटफळ येथील सद्गुरू श्री वामनराव पै शिक्षण संस्थेच्या चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये संस्थास्तरीय ‘अविष्कार स्पर्धा - २०२६' उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, नाविन्यपूर्ण विचारसरणी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाल्या.
स्पर्धेत बी. फार्मसी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पना व प्रकल्पांचे सादरीकरण केले. स्पर्धेमध्ये मेडिसिन अँड फार्मसी, प्युअर सायन्सेस तसेच इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यमापन नावीन्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन पद्धती, विषयाची उपयुक्तता, व्यवहार्यता, सादरीकरण कौशल्य तसेच सामाजिक व व्यावहारिक परिणाम या निकषांच्या आधारे यांची दखल घेत परीक्षकांनी विद्यार्थ्यांची झोनल स्तरासाठी निवड केली.
पदवीपूर्व गटातील मेडिसिन अँड फार्मसी विषयात वैभवी थोरवे यांनी प्रथम क्रमांक, तर नम्रता जाधव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. प्युअर सायन्सेस विषयात स्नेहा गायकवाड यांनी प्रथम क्रमांक, तर सृष्टी मिंडपाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संस्था अविष्कार समन्वयक प्रा.पल्लवी ढावरे यांनी स्पर्धेचे नियोजन व समन्वय केले. महाविद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
फोटो ओळ: यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक
Post a Comment