लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन मध्ये महावितरण ची कार्यशाळा संपन्न
बारामती:प्रतिनिधी
सोमवार, दि २१ सप्टेंबर रोजी लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन बारामती येथे शासकीय महावितरण विभाग, बारामती कार्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अभियंते महेश कानतोडे, गणेश जमाले, शरद येळे, दिग्विजय ठोंबरे व लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनचे चेअरमन प्रा नामदेव लडकत, संचालक गणेश लडकत , संचालक प्रियांका लडकत, शुभागी लडकत ,
प्राचार्य रामचंद्र वाघ व तानाजी गवळी
व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये वीज वापरताना घ्यावयाची योग्य काळजी, सुरक्षिततेचे नियम आणि आवश्यक उपाययोजनांबाबत जनजागृती करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यावेळी महेश कानतोडे व गणेश जमाले यांनी विद्यार्थ्यांना वीज वापरासंबंधीचे नियम, विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना तसेच वीजेपासून होणारे संभाव्य धोके याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सौरऊर्जेचा वापर, त्याचे फायदे आणि शासनाच्या विविध सुविधा व योजनांबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनचे प्राचार्य रामचंद्र वाघ व तानाजी गवळी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी दैनंदिन जीवनात वीज वापरताना येणाऱ्या अडचणी, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि संभाव्य धोक्यांबाबत अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप अनिल काशीद यांनी केले.
फोटो ओळ:
लडकत स्कुल मध्ये महावितरण कार्यशाळा संपन्न प्रसंगी मान्यवर
Post a Comment