News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बॉक्सिंगमध्ये ज्ञानसागरची सुवर्णझेप; ३ सुवर्णपदकांसह विभागीय निवड !

बॉक्सिंगमध्ये ज्ञानसागरची सुवर्णझेप; ३ सुवर्णपदकांसह विभागीय निवड !



सावळ, ता. बारामती : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुल, सावळच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्णपदकांची कमाई केली. या उल्लेखनीय यशामुळे विजेत्या विद्यार्थ्यांची आगामी विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
एम.आय.टी. कॉलेज, लोणी काळभोर येथे दिनांक २९ व ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धापार पडल्या.या स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या खेळाडूंनी विविध वजन गटांत प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये ४६ किलोखालील वजन गटात राजवीर हिम्मत कौले याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. ४९ ते ५२ किलो वजन गटात शिवराजे हिम्मत कौले याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला, तर ६६ ते ६९ किलो वजन गटात नमन भारत होले याने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

या तिन्ही खेळाडूंनी आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर जिल्हास्तरीय स्पर्धेत यश संपादन केले. विशेष म्हणजे, या तिन्ही सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची आगामी विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता विभागीय स्तरावरही आपल्या खेळाची चमक दाखवण्याची संधी या खेळाडूंना मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही विशेष महत्त्व देणाऱ्या ज्ञानसागर गुरुकुलच्या या यशामुळे संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानात भर पडली आहे. खेळाडूंना नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर मानसिंग आटोळे , संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलचे घवघवीत यश;

तीन सुवर्णपदकांची कमाई; विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड*l

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment