News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शासकीय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानसागरच्या खेळाडूंचे वर्चस्व

शासकीय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानसागरच्या खेळाडूंचे वर्चस्व



पाच खेळाडू प्रथम तर तीन खेळाडूंनी द्वितीय क्रमांक पटकावला

बारामती:प्रतिनिधी

बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध वयोगट व वजनगटांमध्ये ज्ञानसागरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीचे दर्शन घडवत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.

या स्पर्धेत ज्ञानसागरच्या पाच खेळाडूंनी प्रथम क्रमांक, तर तीन खेळाडूंनी द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
सोहेल मुस्ताक खान (१७ वर्षे, ४८ ते ५१ किलो गट) , सार्थक सुदर्शन ताकमोगे ( १७ वर्षे, ५१ ते ५५ किलो गट) ऋग्वेद रोशन वराडे (१९ वर्षे, ४५ ते ४८ किलो गट), कृष्णा कैलास सूर्यवंशी (१९ वर्षे, ४१ ते ४५ किलो गट), सुकृत दिलीप तुपे (१७ वर्षे, ७३ ते ७६ किलो गट) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर यशराज तुकाराम धवडे –(१४ वर्षे, २७ ते २९ किलो गट), कृष्णा सुनील गायकवाड ( १७ वर्षे, ३५ किलो गट), श्रेयश बापुराव ठोंबरे (१९ वर्षे, ४५ ते ४८ किलो गट) यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. 

या सर्व खेळाडूंनी स्पर्धेत दाखविलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. खेळाडूंच्या या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेने उपलब्ध करून दिलेल्या क्रीडा सुविधांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सागर आटोळे सर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलच्या खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment