News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

303 किलोमीटर सायकलिंग राईड पूर्ण; स्वतःचाच विक्रम मोडत नवा बेंचमार्क!

303 किलोमीटर सायकलिंग राईड पूर्ण; स्वतःचाच विक्रम मोडत नवा बेंचमार्क!



बारामती :प्रतिनिधी
 सायकलिंगच्या माध्यमातून नियमित व्यायाम आणि फिटनेसचा संदेश देणारे भारत फोर्जमधील कर्मचारी यांनी आपल्या सायकलिंग प्रवासातील आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक नोंदवत 13 तास 18 मिनिटांत तब्बल 303 किलोमीटरची सायकलिंग राईड पूर्ण केली. विशेष म्हणजे, यापूर्वीचा स्वतःचाच विक्रम मोडून त्यांनी नवा बेंचमार्क प्रस्थापित केला.
या यशामागे नियमित सराव, शिस्तबद्ध नियोजन आणि योग्य आहार यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रवासात त्यांच्या जिवलग मित्रांची साथ आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.
या राईडसाठी आहारतज्ञ अंकुश अन्नदाते, जिम ट्रेनर शैलेश गोंडे सर, अक्षय कुदळे सर, शंकर माळवे साहेब, नवनाथ काका भापकर, प्रकाश शितोळे सर तसेच त्यांचा चिरंजीव संग्राम घोडके यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या सर्वांच्या सहकार्यामुळेच कोणताही शारीरिक त्रास न होता ही आव्हानात्मक 303 किलोमीटरची राईड सहजपणे पूर्ण करता आली, असे त्यांनी सांगितले.
“स्पर्धा नेहमी दुसऱ्याशी नसते; ती स्वतःच्या कालच्या विक्रमाशी असते,” या विचारातून स्वतःचाच विक्रम मोडत त्यांनी सायकलिंग क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment