कायद्यानुसार बीएचएमएस व सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी वैध; सरकारच्या निर्णयाचे बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनकडून स्वागत
बारामती: प्रतिनिधी
बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएश ने महाराष्ट्र शासनाने बीएचएमएस व सीसीएमपी ( BHMS-CCMP) पात्र डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत घेतलेल्या निर्णयाचे बैठकीत एकमताने स्वागत करण्यात आले.
बी एच एम एस हा साडेपाच वर्षांचा मान्यताप्राप्त पदवी अभ्यासक्रम असून त्यामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रातील मूलभूत तसेच क्लिनिकल शिक्षणाचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात सैद्धांतिक शिक्षणाबरोबरच रुग्णालयीन प्रशिक्षण आणि अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. त्यामुळे पदवीधारकांना आधुनिक वैद्यकाचे आवश्यक शैक्षणिक ज्ञान व प्रत्यक्ष वैद्यकीय प्रशिक्षण प्राप्त होते.
याशिवाय, महाराष्ट्र शासनाने BHMS डॉक्टरांसाठी Certificate Course in Modern Pharmacology (CCMP) हा अतिरिक्त अभ्यासक्रम सुरू केला असून, शासनमान्य वैद्यकीय महाविद्यालयातून हा अभ्यासक्रम व परीक्षा पूर्ण केलेल्या डॉक्टरांना संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणी देण्यात येत आहे. असोसिएशनच्या मते ही नोंदणी कायदेशीर प्रक्रियेचा भाग असून शासनाच्या निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे.
बैठकीत ग्रामीण व दुर्गम भागातील बी येऊ एम एस डॉक्टरांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख करण्यात आला. अनेक दशकांपासून डॉक्टर ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात सातत्यपूर्ण व अहोरात्र आरोग्यसेवा देत असून, प्राथमिक आरोग्यसेवा सक्षम करण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले.
मुख्यमंत्री यांनी मांडलेली भूमिका ही कायद्याचा सन्मान करणारी असून, शासनाने घेतलेला निर्णय जनहित, ग्रामीण आरोग्यसेवा आणि कायदेशीर प्रक्रियेच्या अनुषंगाने आहे.
, हा लढा कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात नसून कायद्याने बहाल केलेल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी आहे. सर्व BHMS डॉक्टरांनी एकजुटीने, संयमाने व कायदेशीर मार्गाने पुढील लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी बारामती शहर व तालुक्यातील डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्तीत होते
मुख्यमंत्री व मंत्री मंडळाने चौकशी करून दिलेल्या निर्णयाचे असोशियनने स्वागत केले
चौकट:
सर्वसामान्य जनतेला त्रास होईल अशा पद्धतीने आंदोलन करू नये. डॉक्टरांनी आंदोलन करू नये. आम्ही एका डॉक्टरमध्ये आणि दुसऱ्या डॉक्टरमध्ये भेदभाव करू शकत नाही. शासनाने हा निर्णय योग्य कायदेशीर तपासणीनंतर घेतला आहे.”
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
फोटो ओळ: बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन च्या मीटिंग प्रसंगी उपस्तीत डॉक्टर
Post a Comment