झैनबिया स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
कटफळ (ता:बारामती) येथील अब्बास मोहम्मद हुसेन ट्रस्ट संचलित झैनबिया इंग्लिश मिडियम स्कूल कटफळ व बारामती मध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बारामती शहरचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी शेट्टी व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे चेअरमन श्री.धनंजय जामदार, श्री. अजय ढाके व शाळेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या प्राचार्या. इन्सिया नासिकवाला. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आठवी, नववी, दहावी व स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी उत्साहाने व उत्स्फूर्तपणे देशभक्तीवर गीते, भाषणे, कविता व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच प्रमुख पाहुणे श्री धनंजय जामदार सरांनी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतंत्र सैनिकाच्या कार्याची माहिती देत देशप्रेम, एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. यावेळी शाळेच्या प्राचार्यां. इन्सिया नासिकवाला, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला.
Post a Comment