News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामती-इंदापूर उपविभागात ४ महिन्यात सुमारे 80 हजार दाखले वाटप-उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे

बारामती-इंदापूर उपविभागात ४ महिन्यात सुमारे 80 हजार दाखले वाटप-उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे



बारामती, दि. ४:  आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून १  एप्रिल ते आज अखेर बारामती-इंदापूर उपविभागातील विद्यार्थी आणि नागरिकांना एकूण ७९ हजार ९९९ इतके दाखले वाटप करण्यात आले आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे. 

नागरिकांना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पध्दतीने देण्याकरीता उपविभागाने नियोजनपद्धतीने काम करत दाखलयांचे वितरण करण्यात आले आहे. एकूण २५१ महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार केंद्र तसेच तालुक्यातील प्रत्येकी १ सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून उत्पन्नाचे प्रमाणपत्र ४२ हजार ७, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र १२ हजार ३४२, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र १२ हजार ७६६, जात प्रमाणपत्र १० हजार ९९७, केंद्र शासन आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रमाणपत्र ६८४ व राज्य शासन आर्थिकदृष्ट्या दूर्बल प्रमाणपत्र ५१३, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३०५, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र २४५, अल्पभूधारक प्रमाणपत्र १४० आदी विविध सेवांमधून प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत. 

शालेय विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व दाखल्यांचे मुदतीत वितरण करणेत आले आहे, अशी माहिती दिघे यांनी दिली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment