News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

रक्तदान म्हणजे अजितदादा यांना आदरांजली....

रक्तदान म्हणजे अजितदादा यांना आदरांजली....


आदरांजली वाहण्यासाठी मोठा प्रतिसाद

बारामती:प्रतिनिधी 
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.(रविवार १९ जुलै) 
 या
शिबिरात तब्बल १,२३९ रक्तदात्यांनी रक्तदान करून दादांना अनोखी आदरांजली वाहिली. या शिबिराला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार यांनी भेट दिली.

. ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवक-युवतींची संख्याही लक्षणीय होती. महिलांचाही सहभाग उल्लेखनीय राहिल्याने संपूर्ण परिसर समाजसेवेच्या वातावरणाने भारावून गेला.
या प्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोळेकर, बारामती नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, आजी-माजी नगरसेवक, विविध संस्था, सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी, बूथ कमिटीतील सर्व पदाधिकारी, समन्वयक,युवक , सर्व आजी-माजी महिला पदाधिकारी व अजितदादा प्रेमी उपस्थित होते. 

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय पथके आणि विविध रक्तपेढ्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. 

 *चौकट:* 
अजितदादा च्या प्रत्येक श्वासात बारामती चा विकास आहे त्यामुळे रक्तदान करताना सुद्धा विविध क्षेत्रातील विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक,महिला यांनी स्वतः पुढे येऊन रक्तदान केले व दादांना आदरांजली वाहिली हे प्रेम दादांच्या प्रति दिसून आले 
ॲड. किरण इंगळे: बारामती शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

फोटो ओळ : 
विक्रमी रक्तदान करणारे निलेश घोडके यांचा सन्मान करताना जय पवार व सोबत इतर पदाधिकारी

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment