News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कारगील दिना निमित्त वीर पत्नी चा सन्मान

कारगील दिना निमित्त वीर पत्नी चा सन्मान


बारामती:प्रतिनिधी 
बारामती येथील जय जवान आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने कारगील दिन (रविवार दि.२६जुलै) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .
या प्रसंगी बारामती नगरपरिषद चे नगराध्यक्ष सचिन सातव, नायब तहसीलदार विनोद काळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज भंडारी , सुभेदार सोपान बर्गे ,संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर व तालुक्यातील आजी माजी सैनिक ,संघटना पदाधिकारी, वीर नारी, माजी सैनिक बचत गट महिला ,मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
हुतात्मा स्तंभास अभिवादन व शारदा प्रांगण येथील माजी सैनिक स्मृती स्तंभास वीर चक्र अर्पण करून, रायफल सलामी देऊन वीर पत्नी सुनंदा लालासो नाळे (झारगडवाडी) व सविता विजय राजपुरे (पणदरे) यांचा सत्कार करण्यात आला.
देशाच्या सीमेवर लढताना प्राणाची आहुती देऊन देशवासीयांचे रक्षण करणाऱ्या जवानांचे ऋण या जन्मात आपण फेडू शकणार नाही,२६ जुलै कारगिल युद्ध प्रसंगी सीमेवरील जवानांनी दाखविलेला पराक्रम जगातील सर्वोत्तम पराक्रम असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केले.
विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. 
सैनिकांबद्दल असलेले प्रेम,व त्यांचे शौर्य नवीन पिढीला समजावे व कारगिल युद्धातील जवानांना आदरांजली म्हणून दरवर्षी जय जवान आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने कारगिल दिन साजरा करत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव निंबाळकर यांनी सांगितले.
त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

चौकट: 
प्रथम बारामती नगरपरिषद मध्ये व त्यानंतर राज्यात माजी सैनिकांना घरपट्टटी माफ करण्याचा निर्णय अजित पवार यांच्या मुळे झाला माजी सैनिकां बदल अभिमान बाळगणारा नेता 
हनुमंत निंबाळकर: अध्यक्ष बारामती तालुका जय जवान आजी-माजी सैनिक संघटना 

फोटो ओळ: कारगिल दिन निमित्त हुतात्मा स्तंभास अभिवादन करताना आजी माजी सैनिक व मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment