बुडणाऱ्या विद्यार्थ्यांस जीवदान दिल्याबद्दल डॉ खलाटे यांचा सन्मान
बारामती:
बारामती येथील वीर सावरकर स्वीमर्स क्लब येथील जलतरण तलाव मध्ये पोहत असताना शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त पोहल्याने दम लागून बुडत असताना (गुरुवार २८ मे २०२६) स्वीमर्स गार्ड यांनी पाण्याच्या बाहेर काढले परंतु शरीरात पाणी गेल्याने सदर विध्यार्थी बेशुद्ध झाला होता . स्वीमर्स क्लब चे सभासद डॉ राधेय खलाटे यांनी प्राथमिक उपचार देऊन त्वरित शरीरातील पाणी बाहेर काढून सदर विद्यार्थ्यांस शुद्धीवर आणून हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल करून पुढील उपचार देऊन जीवदान दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य औषध विक्री प्रतिनिधी संघटना बारामती तालुका यांच्या वतीने डॉ.राधेय खलाटे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष करण जाधव, आणि अक्षय खलाटे, संजय वाघमोडे, खजिनदार बाजीराव बोडरे, भगवान गायकवाड, तेजस लकडे व इतर सभासद उपस्तीत होते.
संघटनेच्या माध्यमातून सामाजिक भान व जाण ठेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींचा सन्मान करून त्यांच्या कार्यास पाठींबा देत असल्याचे अध्यक्ष करण जाधव यांनी सांगितले.
आभार बाजीराव बोडरे यांनी मानले.
फोटो ओळ: डॉ राधेय खलाटे यांचा सन्मान करताना औषध विक्री प्रतिनिधी संघटना सदस्य
Post a Comment