राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या खेळाडूंची निवड
बारामती:प्रतिनिधी
25 ते 28 जून या वेळेत नाशिक या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या योद्धा स्पोर्ट्स एकादमीच्या 5 खेळाडूंची सफान पठाण, श्रुष्टी घोडके, ईश्वरी मोरे, तेजश्री मुळीक, संयोगिता यादव यांची निवड झालेली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या बळावर राष्ट्रीय स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे.
खेळाडूंच्या या यशामुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला मोठी प्रेरणा मिळाली असून पालक, प्रशिक्षक आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रशिक्षक साहेबराव ओहोळ यांनी सांगितले की, खेळाडूंनी शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. आताच्या राष्ट्रीय स्पर्धेतही हे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून बारामती आणि महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या सर्व खेळाडूंना बारामतीतील योद्धा स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक साहेबराव ओहाळ यांनी मार्गदर्शन केले
Post a Comment