बारामती मार्शलआर्ट्स अकॅडमीचे यश .....
बारामती :प्रतिनिधी
बारामती मार्शलआर्ट्स अकॅडमीचे खेळाडू नेहा आणि शंभू ह्यांचे इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथे दि. ८ मे ते १० मे दरम्यान
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा 2026-27 राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत बारामती मार्शलआर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
यामध्ये ७ ते ९ वर्षे चिल्ड्रन्स वयोगटात अकॅडमीचे उत्कृष्ट खेळाडू निहारीका विकास बनसोडे व शंभूराज सुशांत शिंदे ह्यानी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला व प्रेरणा बाबू ईश्वरे हिने सहभाग नोंदविला
या शानदार यशामुळे नेहाचे व शंभूचे इंदौर,मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय चिल्ड्रन्स कॅडेट किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल यांचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर कडीमणी व सुरेश होसमनी ( राष्ट्रीय कोच ), मार्गदर्शक सतिश राजहंस ( अध्यक्ष किकबॉक्सिंग स्पोर्टस् असोसिएशन पुणे जिल्हा ) यांचे अभिनंदन होत असून सत्कार सोहळा प्रसंगी
पोलीस क्षेत्रातील
दादा माने , अमोल सोनवणे अरबाज शेख व गणेश घुले , उद्योजक,वेंकटेश सोमाणी, प्रफुल्ल जराड बांधकाम व्यवसायिक सागर काटे देशमुख , बंटी भैय्या जगताप , गौरव भंडारे आकाश जाधव व प्रकाश जाधव व
सर्व पालक वर्ग उपस्तीत होते.
ग्रामीण भागातील मुलांनी आत्मनिर्भर व्याहवे व शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी सदर प्रशिक्षण देत असून खेळाडूंनी विविध स्पर्धेत देशाचे नाव उज्जवल करावे असे आवाहन प्रशिक्षक ज्ञानेश्वर कडीमणी यांनी केले.
फोटो ओळ: यशस्वी खेळाडू बरोबर प्रशिक्षक ज्ञानेश्वर कडीमणी
Post a Comment