News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मराठा वधू वर 'हायटेक' परिचय मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद

मराठा वधू वर 'हायटेक' परिचय मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद


पालकां बरोबर नियोजित वधू वर यांचा सहभाग 

बारामती:प्रतिनिधी 
अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने शुक्रवार दि.१मे २०२६ रोजी आयोजित वधू वर मेळाव्यास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पालकां समवेत नियोजित वधू वर यांनी सुद्धा सदर मेळाव्यास उपस्थिती दर्शवली हे या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य ठरले.
मेळाव्याचे उदघाटन नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी बारामती पंचायत समिती चे सभापती किरण तावरे , शहर 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष किरण इंगळे, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप शिंदे, विश्वस्त ऍड विजय तावरे,उद्योजक राजेंद्र खराडे,जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण,महिला तालुका अध्यक्षा ऍड सुप्रिया बर्गे, शहर महिला अध्यक्षा अर्चना सातव व पदाधिकारी उपस्तीत होते.

मराठा समाज्यात विवाह जुळणे हे आव्हान झाले आहे मुलींची संख्या कमी असून शिकलेल्या मुलीच्या अपेक्षा रास्त आहे परंतु नियोजित वधू वर यांनी अडजेस्टमेंट करून विवाह करून सुखी व सुंदर विवाहित आयुष्य जगले पाहिजे त्यासाठी वधू वर परीचय मेळावा ही संधी आहे व संयोजक यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले.

एकाच छताखाली येऊन पालक व पाल्य यांचा वेळ आणि पैसा वाचावा ,एजंट पासून मुक्तता मिळावी या साठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून अतिशय अल्पदरात सदर मेळावा चे आयोजन केल्याचे प्रास्तविक मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ चे तालुकाध्यक्ष संभाजी माने यांनी सांगितले.

सदर मेळावा साठी राज्यभरातून ५७७ बायोडाटा प्राप्त झाले असून पालकांनी या बाबत समाधान व्यक्त केले. नियोजित वधू वर यांचे शिक्षण नौकरी, व्यवसाय, पाहून झाल्यावर नातेसंबंध व पत्रिका तपासून, आर्थिक ,स्थावर मालमता व इतर बाबी चर्चा झाल्यावर 3 विवाह व 2 घटस्फोटीत जमविण्यात संयोजक यांना यश आले आहे.
घटस्फोटीत ,विधवा यांचे सुद्धा विवाह जमविण्यासाठी पालक व स्वतः नियोजित वधू वर यांनी गर्दी केली होती.
 दोन्ही स्क्रीनवर वधू वर यांचा बायोडाटा,सोबतीला निवेदक माहीत देत होते तर काही विवाह इच्छुक तरुण तरुणी स्वतः बद्दलची माहिती व्यासपीठावर येऊन देत होते तसेच पत्रिका पाहण्यासाठी ब्राम्हण व ,स्कॅनवर, लॅपटॉप, प्रिंट, झेरॉक्स वर बायोडाटा उपलब्ध असल्याने व नाष्टा, जेवण व्यवस्था असल्याने पालक व पाल्य यांनी समाधान व्यक्त केले.परदेशी नोकऱ्या करणाऱ्या चे प्रमाण जास्त असल्याने परदेशी स्थळे पाहण्यात पालक व पाल्य यांनी उत्सुकता दाखवली.

चौकट: 
नोकरी, व्यवसाय मुळे पालक, पाल्य, बिझी झाल्याने स्थळ पाहणे खर्चिक झाले आहे म्हणून मराठा समाज्यात आता दर ६ महिन्याला वधू वर परिचय मेळाव्याची आवश्यकता आहे.
मनोज शिंदे,परभणी (मुलीचे पालक) 

चौकट: 
लग्न जमण्यासाठी एजंट कडून फी म्हणून पैसे, सोन्याची अंगठी, कपडे आदींची मागणी होत असते तर काही ठिकाणी एजंट कडून आर्थिक फसवणूक होत असते त्यामुळे पालक व पाल्य यांना आर्थिक व मानसिक त्रास होतो त्यामुळे बारामती अखिल भारतीय मराठा महासंघ चा उपक्रम कौतुकास्पद आहे

बाबुराव पाटील ,सातारा (मुलाचे पालक) 

चौकट: 
वाढती महागाई असल्याने,व मोठ्या शहरात स्थळ पाहिजे असल्याने नोकरी करणाऱ्या नियोजित वधू वर यांना मागणी जास्त आहे परंतु शेती ,व्यवसाय ,उद्योजक याना सुद्धा स्थळ मिळावे म्हणून राबविलेल्या उपक्रमामुळे विवाह जमण्यास मदत होईल
शशिकांत तुपे, हडपसर पुणे 
(विवाह इच्छुक उद्योजक) 

फोटो ओळ: 
अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित वधू वर परिचय मेळावा प्रसंगी पालक व पाल्य (छायाचित्र: नितीन मांडगे)

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment