News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

डॉ बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरक : संजय बनसोडे

डॉ बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरक : संजय बनसोडे



बिरजू मांढरे यांच्या वतीने 
डॉ. आंबेडकर वसाहत येथे जयंती साजरी 

बारामती:
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण व त्यांचे विचार या मुळे अनेक जण शिकले, नोकरी व्यवसायास लागले विविध क्षेत्रात कार्यरत आहेत तरीही विचार संपत नाही म्हणून डॉ आंबेडकर यांचे विचार आजही प्रेरक असल्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार संजय बनसोडे यांनी प्रतिपादन केले.
१४ एप्रिल रोजी बिरजू मांढरे मित्र परिवार यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित पूजा पाठ कार्यक्रमात आमदार सुनील बनसोडे मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष सचिन सातव, मा.नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, गणेश हिंगणे, नवनाथ बल्लाळ, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष ऍड किरण इंगळे, युवक अध्यक्ष अभिजित घाडगे, विद्यार्थी अध्यक्ष मेघराज माने, उद्योग व्यापार अध्यक्ष वैभव शिंदे, रियाझ शेख, शैलेश वणवे व मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा अध्यक्ष राजू मांढरे व विजय तेलंगे, किरण बोऱ्हाडे, नितीन फासगे,सिद्धार्थ सावंत, चंद्रकांत कसबे, सोमेश सुतार, श्रीमंत मांढरे व 
साईच्छा सेवा ट्रस्ट,लहुजी वस्ताद दहीहंडी संघ चे पदाधिकारी व डॉ आंबेडकर वसाहत मधील नागरिक उपस्तीत होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, सार्वजनिक वाचनालय आदी 
 सामाजिक कार्यातून आंबेडकर जयंती साजरी करण्याचा वारसा स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या माध्यमातून मिळाला तो सामाजिक वारसा या पुढेही चालू ठेवणार असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

फोटो ओळ: डॉ आंबेडकर जयंती साजरी करताना आमदार सुनील बनसोडे ,हिरामन खोसकर ,बिरजू मांढरे व इतर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment