News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

"मयुरेश्वर मंदिराला 'सुरक्षा' कवच; एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी रंगीत तालीम"

"मयुरेश्वर मंदिराला 'सुरक्षा' कवच; एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी रंगीत तालीम"


​सुपा (पुणे):

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आज मोरगाव येथील प्रसिद्ध श्री मयुरेश्वर मंदिर परिसरात दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिकाराची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत झालेल्या या मोहिमेमुळे मंदिर परिसराला जणू छावणीचे स्वरूप आले होते. भाविकांची सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीतील सज्जता तपासण्यासाठी हा सराव करण्यात आला.
असा होता थरार...

​मंदिरात दहशतवादी घुसल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. माहिती मिळताच सुपा पोलीस, एटीएस (ATS), क्यूआरटी (QRT) आणि बीडीडीएस (BDDS) या पथकांनी तातडीने धाव घेत परिसराचा ताबा घेतला.
​QRT आणि ATS: या पथकांनी हल्लेखोरांना अत्यंत कौशल्याने घेराव घालून त्यांना जेरबंद करण्याची कारवाई केली.
​BDDS पथक: बॉम्ब शोधक व नाशक पथकाने मंदिर परिसरात संशयास्पद वस्तूचा शोध घेऊन ती सुरक्षितपणे निकामी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
​४४ जवानांचा सहभाग
​या रंगीत तालीमेत सुपा पोलीस स्टेशनचे २ अधिकारी व ९ कर्मचारी, दहशतवादी विरोधी पथकाचे १ अधिकारी व ७ कर्मचारी, क्विक रिस्पॉन्स टीमचे ९ कर्मचारी, बॉम्ब शोधक पथकाचे १ अधिकारी व ६ कर्मचारी आणि होमगार्डच्या जवानांसह एकूण ४४ जणांनी सहभाग घेतला. सर्व यंत्रणांमध्ये कमालीचा समन्वय यावेळी दिसून आला.


​"भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्वरित ११२ क्रमांकावर संपर्क साधावा."
— मनोजकुमार नवसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुपा पोलीस स्टेशन.


वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
​ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सपोनि मनोजकुमार नवसरे, सपोनि प्रकाश पवार (एटीबी), फौजदार सुरेश गिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
​या यशस्वी सरावामुळे मयुरेश्वर मंदिराची सुरक्षा यंत्रणा अधिक भक्कम झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment