News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महिलांसाठी ज्वेलरी प्रशिक्षण संपन्न

महिलांसाठी ज्वेलरी प्रशिक्षण संपन्न

महिलां साठी ज्वेलरी प्रशिक्षण संपन्न
बारामती: प्रतिनिधी 
१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून
महिला आर्थिक स्वालबन साठी साधिका बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बारामती हनुमान नगर आणि माणदेशी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाणे महिलांसाठी मोफत विविध मोत्यांचे जेवलरी प्रशिक्षण संपन्न करण्यात आले.
..काळाची पावले ओळखून महिलांचा मोत्यांचे दागिने घालण्याचा कल पाहुण व वाढती मागणी लक्षात घेऊन महिलांना रोजगार मिळावा व बनविलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी म्हणून साधिका बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बारामती हनुमान नगर आणि माणदेशी फाउंडेशन दोन्ही संस्थांच्या वतीने परिसरातील ५० महिलांना मोत्यांची ज्वेलरी मोफत मार्केटिंग स्किल या संदर्भात महिलांना ट्रेनिंग देण्यात आले बनवलेल्या प्रॉडक्ट ला पॅकेजिंग व विक्री कला या संदर्भात सर्व माहिती देण्यात आली..पुणे जिल्ह्यातील यशस्वी महिला उद्योजिका यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले एका स्त्रीने ठरवलं तर ती व्यवसायात उंच भरारी घेऊ शकते हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्यांच्या कामातून कसे सिद्ध केले हे पटवून सांगितले.प्रमुख उपस्थिती सहाय्यक अधिकारी सुप्रिया पवार, उद्योजिका सविता माने, वैशाली करे,मनिषा बगाडे,संध्या जगताप.प्रशिक्षक धनश्री पवार, अर्चना सातव( साधिका फाउंडेशन अध्यक्ष) हर्षदा सातव उपाध्यक्ष, माधवी शेडगे आदी मान्यवर महिला उपस्तीत होत्या.

फोटो ओळ: मोत्यांचे ज्वेलरी प्रशिक्षण चे उदघाटन करताना मान्यवर महिला

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment