News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

देशाच्या प्रगती मध्ये महिलांचे स्थान महत्वाचे : सुषमा चव्हाण

देशाच्या प्रगती मध्ये महिलांचे स्थान महत्वाचे : सुषमा चव्हाण

देशाच्या प्रगती मध्ये महिलांचे स्थान महत्वाचे : सुषमा चव्हाण 

बारामती: प्रतिनिधी 
देशाच्या प्रगतीमध्ये विविध राज्यांमध्ये महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मानवबंध फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा चव्हाण यांनी केले.

बारामती मधील टेक्स्टाईल पार्क येथील पर्पल क्रिएशन या कंपनीमध्ये विमेन्स अरेंजमेंट या विषयावर कंपनीमध्ये महिलांना मार्गदर्शन दिले या प्रसंगी सुषमा चव्हाण यांनी प्रतिपादन केले.
या प्रसंगी कंपनीचे अधिकारी श्री महेश पाटील, मनोज सिन्हा व महिला प्रतिनिधी राजश्री तुपे आणि कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आजच्या आधुनिक आणि प्रगत समाजात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षण, उद्योग, प्रशासन, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांत महिला उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मात्र कार्यक्षेत्रात महिलांना काही वेळा छळ, अन्याय, भेदभाव आणि असुरक्षिततेला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत महिलांना त्यांच्या हक्कांची आणि कायद्यांची माहिती असणे अत्यावश्यक ठरते.
कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना विविध कायदे, त्यांचे अधिकार आणि संरक्षणाची साधने यांची सविस्तर माहिती देऊन कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी महिलांना आत्मविश्वासाने काम करण्यासाठी कायदेशीर संरक्षण कसे उपलब्ध आहे हे स्पष्ट केले. विशेषतः कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (POSH Act), महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे, तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
 उपस्तितांचे आभार महेश जगताप यांनी मानले.
फोटो ओळ: महिलांना मार्गदर्शन करताना सुषमा चव्हाण व समोर उपस्तीत महिला.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment