News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे येथील स्ट्रॉबेरी शेताला भेट

फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे येथील स्ट्रॉबेरी शेताला भेट



पुणे, दि. 5 जानेवारी : 

राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री  भरतशेठ गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी महादेव कोळी व  परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीची पद्धत, रोपवाटिका व्यवस्थापन, उत्पादन क्षमता, बाजारपेठ, खर्च–उत्पन्नाचे गणित तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती घेतली.
स्ट्रॉबेरीसारखी उच्च मूल्य पिके शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद करून मंत्री गोगावले यांनी फलोत्पादन विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य शेतकऱ्यांना दिले जाईल, असे आश्वासन दिले. ओझर्डे परिसरात स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी ठरत असल्याचे सांगत आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन प्रणाली तसेच सुधारित रोपांचा वापर करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
महाबळेश्वरसह वाई, कोरेगाव व जावळी तालुक्यांचा परिसर स्ट्रॉबेरी व फलोत्पादनासाठी अत्यंत पोषक असून, स्ट्रॉबेरी, फळबागा तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी ‘स्मार्ट’ व पीएमएफई (PM-FME) योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रगतीशील शेतकरी फाटक यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment