सावळ मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
बारामती: प्रतिनिधी
शुक्रवार दि.०९ जानेवारी रोजी सावळ मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप बांदल
यांच्या हस्ते करण्यात आले.
पशुवैद्यकीय दवाखाना (चिकित्सालय) इमारत बांधणे व माऊलीनगर अंतर्गत रस्ता चे भूमिपूजन करण्यात आले.
पंचायत समिती अधिकारी प्रशांत मिसाळ यांनी उभे राहत असलेल्या।
पशुवैद्यकीय दवाखाना मधील सेवा सुविधा बदल माहिती दिली.
सदर इमारती मुळे गावाच्या विकासात भर पडेल व गावातील पारंपरिक पशु व्यवसायात सुधारणा होणार असल्याचे संभाजी होळकर यांनी सांगितले.
शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सरपंच तृप्ती वीरकर यांनी सांगितले.
या प्रसंगी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी नवनाथ नराळे, संजय पराडे ,महेश गायकवाड व सरपंच तृप्ती विरकर उपसरपंच चेतन आटोळे, दत्तात्रय आवाळे, प्रवीण आटोळे, बाळासाहेब आटोळे,अनिल आवाळे, बाळासाहेब विरकर, सचिन आटोळे मारुती आटोळे, फक्कड बालगुडे राजेंद्र आटोळे जालिंदर भिसे,आप्पा काशीद,रमेश साबळे, जितेंद्र विरकर व विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ: भूमिपूजन प्रसंगी होळकर, बांदल व सरपंच तृप्ती वीरकर आणि मान्यवर
---------------------------
Post a Comment