जागतिक एड्स दिन बारामतीमध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन
बारामती:प्रतिनिधी
दि. १ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त, विद्या प्रतिष्ठानच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्याल व रेड रिबियन क्लब रुई हॉस्पिटल बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना मार्फत एचआयव्ही, एड्स या विषयांवर जागरुकता निर्माण होण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या वर्षीच्या जागतिक एड्स दिनाची थीम आहे " गेल्या काळातील अडचणींवर मात करणे, आणि एड्स विरोधातील प्रतिसादात बदल घडवणे ". दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धोकादायक आजार एड्सचे उच्चाटन करण्यासाठी एक मोहीम आहे. या दिवसाचा उद्देश आहे, एचआयव्ही/एड्सबद्दल जागरूकता वाढवणे, पूर्वग्रह व कलंक मिटवणे, एड्सग्रस्त व्यक्तींकडे सहानुभूती दाखवणे, आणि त्रास, भेदभाव कमी करण्यासाठी लोक-समाजात व आरोग्य संस्थांमध्ये विचार व कृती वाढवणे.
या रॅलीचे उद्घाटन प्राचार्या डॉ सुमन देवरुमठ व प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नम्रता वाघमोडे (रेड रिबियन क्लब) राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत शेरखाने, व रुई हॉस्पिटल येथील डॉक्टर उपस्तीत होते.
पेन्सिल चौक, संदीप कॉर्नर, रुई हॉस्पिटल, अभिमन्यु कॉर्नर ते महाविद्याल या प्रमुख भागांतून निघालेल्या या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी एचआयव्ही/एड्स जनजागृती आणि प्रतिबंधाचा प्रचार करणार्याय घोषणा, फलक आणि बॅनर च्या माध्यमातून दिल्या. या कार्यक्रमाने एड्स महामारीशी लढण्यासाठी एकता आणि जबाबदारीचा संदेश यशस्वीपणे दिला.
फोटो ओळ: पेन्सिल चौक येथील रॅली मध्ये सहभागी विद्यार्थी
-------------------------
Post a Comment