News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सुरज सुर्यवंशी याचे महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत यश

सुरज सुर्यवंशी याचे महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत यश


बारामती: प्रतिनिधी
दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या "राष्ट्रीय ग्राहक दिन" निमित्त आयोजित राज्यस्तरीय संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत कु.सुरज सुधीर सुर्यवंशी याने प्रथम क्रमांक मिळवला .
 डॉ. सायरस पुनवाला स्कुल मध्ये इयत्ता ७ मध्ये शिक्षण घेत आहे. "राष्ट्रीय ग्राहक दिन" या विषयावर दिलेल्या भाषणास "प्रथम" पारितोषिक मिळाले. पंचायत समिती बारामती येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रांताधिकारी वैभव नावडकर,तहसीलदार स्वप्नील रावडे ,पंचायत समिती चे गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक नितीन हाटे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, जिल्हा ग्राहक परिषद सदस्य प्रमोद जाधव, पुरवठा अधिकारी तितिक्षा बारापत्रे आदी उपस्तीत होते.
 संस्कृत या अतिशय प्राचीन तसेच क्लिष्ट भाषेत उल्लेखनीय कामगिरीसाठी शासनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व "प्रमाणपत्र" देऊन विशेष गौरव करण्यात आला. सुराजच्या या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक व विशेष दखल घेत "रेडिओ वसुंधरा वहिनी ने त्याला निमंत्रित करत त्याची खास मुलाखत' संस्कृत व भारत यावर ' यावर प्रसारीत केली होती.
 संस्कृत अतिशय म्हतपूर्ण भाषा असून बोलणे लिहणे वाचणे या माध्यमातून आपण प्राचीन इतिहास जगा समोर आणू शकतो असेही सूरज सूर्यवंशी यांनी सांगितले.

फोटो ओळ: 
सूरज सूर्यवंशी याचा सन्मान करताना मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment