News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

ज्ञानसागर ला जिल्हास्तरीय स्पर्धेत १० सुवर्ण, १ कांस्य पदकांची कमाई

ज्ञानसागर ला जिल्हास्तरीय स्पर्धेत १० सुवर्ण, १ कांस्य पदकांची कमाई


बारामती:प्रतिनिधी
पुणे जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या खेळाडूंनी आणखी एक भक्कम ठसा उमटवत तब्बल १० सुवर्ण पदके आणि १ कांस्य पदक पटकावून जिल्ह्यात व संस्थेत अभिमानाची लाट निर्माण केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक गुणवान खेळाडूंमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळाली. त्यातही ज्ञानसागर गुरुकुलचे खेळाडू सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत आघाडीवर राहिले.
स्पर्धेत स्नेहल दराडे, सिद्धी साबळे, आकांक्षा लोखंडे, श्रावणी जाधव, काव्या मजगर, सोहेल खान, सार्थक ताकमागे, प्रतिक गवळी, सुकृत तुपे आणि संकुल देवकर यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. प्रत्येक खेळाडूने अचूक स्ट्राईक, संयमित बचाव आणि शक्तिशाली तंत्राच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
तसेच श्रेयश ठोंबरे याने जोरदार लढतीत उल्लेखनीय खेळ करत कांस्य पदक मिळविले.
या ऐतिहासिक कामगिरीवर प्रतिक्रिया देताना ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे म्हणाले :
“ज्ञानसागर गुरुकुलचे खेळाडू आज ज्या आत्मविश्वासाने, शिस्तीने आणि जोमाने रिंगमध्ये उतरले, ते पाहून आम्हाला अपार अभिमान वाटतो. ही पदके केवळ विजयाची खूण नाहीत, तर सातत्यपूर्ण मेहनत, आदर्श प्रशिक्षण आणि पालकांच्या सहकार्याचे यश आहे. आमचे खेळाडू जिल्हास्तरावर अशी चमकदार कामगिरी करत असल्याने पुढील राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांचे यश निश्चितच उज्वल असेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. ज्ञानसागर गुरुकुल क्रीडा क्षेत्रातही गुणवत्तेला व प्रगतीला समान महत्त्व देत राहील.”
संस्थेच्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या विजयामुळे ज्ञानसागर गुरुकुलच्या थाय बॉक्सिंग संघाचा आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत झाला असून संस्थेचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक अधिक भक्कम झाला आहे.



Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment