शासनाच्या योजना तळागाळा पर्यंत पोहचवा: दत्तात्रय भरणे
बारामती: प्रतिनिधी
तरुणांना उद्योग व्यवसाय साठी योजना ,वंचित, आर्थिक दृष्टीने दुर्बल विधवा, परितक्त्या ,अपंग, औद्योगिक क्षेत्र आदी सर्वांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी दिनदर्शिका हे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
बारामती एमआयडीसी येथील उद्योजक राहुल लावर यांच्यावतीने शासन आपल्या दारी या दिनदर्शिका च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व औद्योगिक क्षेत्रात कामाच्या संधी,उद्योग उभारणीसाठी एमआयडीसी च्या योजना आदी विषयावर आधारित 'दिनदर्शिका २०२६ ' चा प्रकाशन सोहळा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सारिका भरणे, अनिकेत भरणे, श्रीराज भरणे व बारामती, इंदापूर तालुक्यातील उद्योजक उपस्तीत होते.
राहुल लावर विचार मंच बारामती यांच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशन करण्यात येते व सामाजिक बांधिलकी म्हणून शासनाच्या योजना ची माहिती सुशिक्षित बेरोजगार व महिला , वंचित घटक यांच्या पर्यंत पोहचविणे साठी मदत केली जात असल्याचे उद्योजक राहुल लावर यांनी सांगितले.
आभार महेश जगताप यांनी मानले
फोटो ओळ:
दिनदर्शिका प्रकाशन समारंभ प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राहुल लावर व इतर मान्यवर
Post a Comment