मनाच्या ताकतीने ध्येय गाठता येते,: धनश्री भगत
बारामती : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय,बारामती यांच्या वतीने २४ ते ३०डिसेबर २०२५ या दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजे कन्हेरी ता बारामती येथे आयोजित केलेले आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.. धनश्री भगत (पोलीस उपनिरीक्षक, बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन) लाभल्या होत्या. यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन तसेच समाजात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी तरुणांनी स्पर्धा परीक्षांबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास सरपंच सुरेखा शेलार अध्यक्षा म्हणून लाभल्या होत्या, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्त बंडू शेलार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सामाजिक कार्यात युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आणि मोबाईल चे दुष्परिणाम याबद्दल माहिती दिली तसेच संतोष शिंदे (पोलीस हवालदार) यांनी कचरा व्यवस्थापन प्लास्टिक चा अतिरेक तसेच जागतिक तापमानवाढ याबद्दल माहिती दिली
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या सुमन देवरूमठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनंत शेरखाने यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा सूर्यवंशी व प्रास्ताविक पूर्वा वानखेडे यांनी मांडले तर आभार प्रदर्शन सुमित पाटील यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उपयुक्त व प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाल्याने कार्यक्रम यशस्वी ठरला. या कार्यक्रमाला कन्हेरी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील ग्रामस्थ व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते
Post a Comment