News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनमध्ये तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न

लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनमध्ये तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न


विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग 
बारामती: प्रतिनिधी
 कला, ज्ञान आणि कल्पकतेचा संगम म्हणावा असा तालुकास्तरीय स्पर्धांचा दिमाखदार सोहळा शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, बारामती येथे संपन्न झाला.
रंगभरण, पोस्टर मेकिंग, निबंध लेखन आणि वक्तृत्व या स्पर्धांमध्ये १०० पेक्षा जास्त शाळांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमात ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सादर केली तर पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना उत्साहवर्धन केले.
 प्रथम क्रमांक विजेत्यांना सायकल ,
 द्वितीय क्रमांक विजेत्यांना स्टडी टेबल,तृतीय क्रमांकासाठी १००० ते ३००० रुपयांची रोख रक्कम
या आकर्षक बक्षिसांमुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात भर पडली.
 संस्थेचे चेअरमन नामदेव लडकत, सचिव गणेश लडकत, संचालिका शुभांगी लडकत व प्रियंका लडकत यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
प्राचार्य रामचंद्र वाघ, शाळेचे प्रमुख तानाजी गवळी, निलेश लोणकर आणि रेश्मा लडकत उपस्तीत होते.
 सूत्रसंचालन अनिल काशीद यांनी तर आभार प्रदर्शन सुशांत गायकवाड यांनी केले.


-------------------------

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment