म्हसोबावाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती (प्रतिनिधी) : सिटी हेल्थकेअर हॉस्पिटल, बारामती आणि ग्रामपंचायत म्हसोबावाडी यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसोबावाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर महादेव मंदिर परिसरात दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत पार पडले.
शिबिरामध्ये रक्तदाब, ब्लड शुगर (RBSL, HBA1C), हाडांची घनता तपासणी तसेच एक्स-रेवर विशेष सवलत देण्यात आली. तसेच गुडघे व नितंब प्रत्यारोपण (Total Knee & Hip Replacement) शस्त्रक्रियेसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या.
या शिबिराला युवा राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष श्री. संदीप चांदगुडे, सरपंच राजेद्र राऊत यांची उपस्थिती लाभली व डॉ. अमोल चांदगुडे, डॉ. इशान गजबे आणि डॉ. ज्ञानेश्वर घाडगे ,धीरज चांदगुडे, पंकज चांदगुडे, दत्तात्रय चांदगुडे आदी उपस्थित होते . मान्यवर डॉक्टर यांनी आजारांचे निदान, प्रतिबंध आणि योग्य उपचार याबाबत रुग्णांना सविस्तर माहिती दिली.
उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवात, हाडांची ठिसूळता, पाठदुखी, मानदुखी तसेच वृद्धापकाळातील गुडघेदुखी यांसारख्या आजारांवरील तपासणीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या आरोग्य शिबिराचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सिटी हेल्थकेअर हॉस्पिटलचे किशोर जांबले, किरण राठोड तसेच सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य यांचे ग्रामस्थांकडून मन:पूर्वक आभार मानण्यात आले.
Post a Comment