News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कैलासवासींच्या स्मरणार्थ गोजुबावीमध्ये ‘होम मिनिस्टर – पैठणीचा

कैलासवासींच्या स्मरणार्थ गोजुबावीमध्ये ‘होम मिनिस्टर – पैठणीचा


 वृषालीताई येतकाळे ठरल्या मानकरी

 *बारामती (प्रतिनिधी):* 
नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोजुबावी येथे श्री गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने आणि कैलासवासी सहकाऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 
 सावळेपाटील प्रस्तुत “होम मिनिस्टर पैठणीचा” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
वृषालीताई येतकाळे यांनी होम मिनिस्टर 2025 हा मानाचा किताब पटकावला,
तर रुपालीताई सावंत उपविजेत्या व 
 वैशालीताई जाधव, सविताताई सावंत, आणि कीर्तीताई कांबळे यांनी अनुक्रमे तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक मिळवला.
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा” या सामाजिक संदेशांवर आधारित उखाणे, म्हणी, मनोरंजक खेळ आणि नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.
गावातील शेकडो महिलांनी उत्साहाने सहभाग घेत विविध बक्षिसे जिंकली.
कैलासवासी सदस्यांच्या स्मृतींना अभिवादन आणि ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना आत्मविश्वास देणारे व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक सहभाग वाढवणे हे उद्दिष्ट असल्याचे आयोजक तुषार गटकळ यांनी सांगितले.
 शेखर होळकर, भगवान कदम, सुहास आटोळे, आप्पासाहेब गाढवे, विकास कुंभार, संतोष सावंत, राहुल मोकाशी, चंद्रकांत राऊत, महेंद्र होळकर, आनंदराव कदम, न्याजुद्दीन शेख, आई अलका (बाई) गटकळ व वर्षाराणी गटकळ व 
 बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, महादेव गायकवाड, डॉ. दिनेश हंचाटे, सरपंच प्रतीक्षा सचिन भोसले, उपसरपंच हिराबाई बद्रीनाथ जाधव, नारायण जाधव, नितीन गटकळ, विकास आटोळे, अशोक आटोळे, काका आटोळे, सचिन जाधव, रुपाली सावंत, आणि वंदना कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात चूल आणि मूल या पलीकडे जाऊन समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले.
फोटो ओळ:
गोजुबावीतील ‘होम मिनिस्टर – पैठणीचा’ कार्यक्रम प्रसंगी विजेत्या महिला आणि तुषार गटकळ व इतर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment