कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नेहमी कटिबद्ध राहणार: मनोज तुपे
रियल डेअरी मध्ये ऐतिहासिक वेतन वाढ
बारामती: प्रतिनिधी
कर्मचारी व त्यांचे कंपनी साठी योगदान महत्वाचे असल्याने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नेहमी कटीबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन रियल डेअरीचे चेअरमन मनोज तुपे यांनी केले.
रियल डेअरी च्या वतीने कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक वेतन वाढ देण्यात आली या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मनोज तुपे बोलत होते या प्रसंगी
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार ,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी,उद्योजक दिलीप भापकर, सुरेश परकाळे,भारत मोकाशी,हरीश कुंभरकर, दत्तात्रय नलवडे, संजय थोरात,प्रा शशिकांत चौधर,मनोज मीरगाणे, विजय कदम, राहुल जगताप, नरेश तुपे,नामदेवराव तुपे, विकास जगताप आदी मान्यवर व कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व कुटूंबीय उपस्तीत होते.
दोन वर्षा पूर्वी ज्यांची वेतनवाढ झाली त्यांना १ जून २०२५ पासून २५ ते ५०% वेतनवाढ झाली आहे.
तर १ते दीड वर्ष पूर्ण झाले आहेत त्या कर्मचाऱ्यांना २५ ते ३०%
वेतन वाढ झाली आहे रियल डेअरी च्या १११ कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळाली आहे सदर वेतन वाढ बारामती एमआयडीसी मध्ये उच्चंकी व ऐतिहासिक वेतन वाढ असल्याचे मनोज तुपे यांनी सांगितले.
कंपनीच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळत असल्याने मुलांचा शैक्षणिक विकास व कुटूंबियाना आधार मिळत असल्याने समाधानी व संतुष्ट कर्मचाऱ्यांची कंपनी म्हणून रियल डेअरी ची ओळख झाली असल्याचे विविध मान्यवरांनी मनोगत मध्ये सांगितले.
सदर वेतन वाढ कर्मचाऱ्यांच्या व कुटूंबियाच्या जीवनात बदल घडवेल सदर वेतन वाढ मुळे समाधानी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना वेतनवाढ पत्र देण्यात आले
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले तर आभार संचालिका अनिताताई तुपे यांनी मानले.
फोटो ओळ:
रियल डेअरी च्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढवाढ पत्र देताना मान्यवर
-----------------------------
Post a Comment