बारामती माळावरची देवी मंदिर मध्ये नवरात्र उत्सव निमित्त विविध कार्यक्रम
बारामती:प्रतिनिधी
तुळजाभवानीचे प्रतिरूप म्हणून बारामतीची माळावरच्या देवीची ख्याती आहे. नवरात्रानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविक राज्यभरातून बारामती मध्ये येत असतात.
सोमवार दि.२२सप्टेंबर रोजी दुपारी १२ नंतर घटस्थापना, शुक्रवार दि २६ सप्टेंबर रोजी ललिता पंचमी निमित्त देवीची काठी उभारणे, मंगळवार दि.३० सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी निमित्त होम विधी रात्री १२ नंतर नवमी (घट उठणार) बुधवार ०१ ऑक्टोम्बर रोजी नवमी घट उठविणे ,गुरुवार दि ०२ ऑक्टोम्बर विजय दक्षमी दसरा रात्री १२ नंतर देवीची पालखी सीमोलंघन साठी प्रस्थान करणार आहे.
सोमवारी दुपारी १२ नंतर घटस्थापना झाल्यापासून नवरात्र होई पर्यंत पहाटे ५ रोज मंदिर रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.
गेली सहा पिढ्यांपासून गाढवे कुटुंबीय नवरात्र उत्सव साजरा करीत आहे. यामध्ये हरिभाऊ गाढवे, सोमलिंग गाढवे, अतुल गाढवे, राहुल गाढवे, प्रमोद गाढवे, प्रशांत गाढवे, दिनेश गाढवे आदींचा समावेश आहे. नवरात्र उत्सवात बारामतीकर उत्साहाने सहभागी होत असतात. पूर्वी मंदिराच्या सभोवती जंगल होते. आता वाढत्या नागरिकीकरणामुळे मंदिर शहराच्या मध्यभागी आले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून दर मंगळवारी व शुक्रवार आणि पौर्णिमेला 'भाविक येत असतात. नवरात्रात बारामतीसह सोलापूर, सातारा, नगर आदी भागातून व नोकरी निमीत्त राज्यभरात विविध ठिकाणी असेलेले भाविक आवर्जून दर्शनाला येतात.
नवरात्र उत्सवात देवीची विविध नऊ रूपे साकारण्यात येतात. उत्सवानिमित्त मंदिरास रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मंदिराच्या परिसरात पाळणे, झोके, आकर्षक खेळणी, खाद्य पदार्थ विक्रेते यांनी दुकाणे थाटली असून नऊ दिवस जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. भाविक म्हणून अनेक राजकीय मंडळी येत असतात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोवस्त सज्ज असतो
चौकट:
जळोची येथील देवीचे भक्त
कै. दत्तात्रय गाढवे यांना वाढत्या वयोमानाने तुळजापूर येथे दर्शनाला जाता येत नसल्याने त्यांची भक्ती पाहून त्यांच्या स्वप्नामध्ये तुळजापूरच्या देवीने दर्शन देऊन मी तुमच्या पाठीशी आहे असा आशीर्वाद दिला तुम्ही चालत रहा असे सांगितले परंतु चालत असताना गाढवे यांनी पाठीमागे वळून पाहिले त्यानुसार सदर देवी येथे प्रकट झाली व त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले अशी आख्यायिका आहे.
फोटो ओळ :
बारामती ची माळावरची देवी ची मूर्ती
Post a Comment