दूध उत्पादक च्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : नानासाहेब थोरात
बारामती:प्रतिनिधी
देशातील दूध उत्पादक यांच्या समस्या सर्वच राज्यात थोड्या फार सारख्याच आहे परंतु प्रत्येक राज्यातील दूध उत्पादक व कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य दूध उत्पादक आणि कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासो थोरात यांनी केले.
शनिवार २० सप्टेंबर रोजी बंगलोर (कर्नाटक) येथे
महाराष्ट्र राज्य दूध उत्पादकआणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांची राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.
मध्ये कर्नाटका मिल्क फेडरेशन (नंदिनी डेअरी)चे प्रतिनिधी त्यांच्यासोबत चर्चा करत असताना वेगवेगळ्या समस्या वरती आणि वेगवेगळ्या प्रश्नावरती कामगारांच्या व तसेच दूध उत्पादकांच्या प्रश्नावरती एकत्रित चर्चा झाली या प्रसंगी
उपाध्यक्ष केरबा पाटील,सरचिटणीस बापूराव वामन जाधव ,खजिनदार संतोष साळुंके ,सदस्य मच्छिंद्र चिने चंद्रकांत माने ,विश्वास पाटील, तानाजी ताकवले ,राजेंद्र कोकाटे नवनाथ जाधव , प्रमोद जगताप व कर्नाटक मिल्क फेडरेशन (नंदिनी डेअरी) चे रायप्पा कुंलवर, मलशेट्टी आदी मान्यवर उपस्तीत होते.
दूध कामगार यांच्या भविष्य निर्वाह निधी मधील अडचणी दूर करू व कामगारांना पेन्शन योजना व इतर शासकीय फायदे मिळवून देण्यासाठी प्रत्येक राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे नानासाहेब थोरात यांनी सांगितले.
के. एम. एफ. ने एक करोड लिटर मिल्क पर डे चा टप्पा गाठला व त्याचबरोबर वेगवेगळी उपक्रम जे कामगारांसाठी आणि दूध उत्पादकासाठी राबवल्या जातात त्याबद्दल माहिती घेऊन ग्रामीण भागातील मिल्क कलेक्शन सेंटरला देखील भेट देण्यात आली त्या दरम्यान दूध उत्पादक शेतकरी व तसेच के एम एफ (नंदिनी )बोर्ड ऑफ डायरेक्टर व कामगारांची चर्चा करण्यात आली .
आभार कर्नाटक मिल्क फेडरेशन चे करपाया मंडलगी यांनी मानले.
फोटो ओळ:
महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांचा सत्कार करताना कर्नाटक येथील दूध उत्पादक व कामगार प्रतिनिधी
------------------
Post a Comment