News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये रेड रिबीन क्लब च्या एड्स विषयक जनजागृती

कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये रेड रिबीन क्लब च्या एड्स विषयक जनजागृती



बारामती:प्रतिनिधी
 दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी विद्या प्रतिष्ठानचे कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रेड रिबीन क्लब तर्फे एचआयव्ही , एड्स जनजागृती करिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था मुंबई विभाग पुणे यांच्या मार्फत एचआयव्ही,एड्स विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रुई हॉस्पिटल चे डॉ. देवेंद्र वेताळ यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही आणि एड्स म्हणजे काय? त्यामधील फरक, एचआयव्ही कसा पसरतो? प्रसारित न होण्याचे मार्ग, एचआयव्हीवर उपचार काय आहे? एचआयव्ही आणि एड्सची लक्षणे कोणती? एड्सचे प्रतिबंध निदान कसे केले जाते? एचआयव्ही शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर, विशेषतः सीडी४ पेशींवर (टी पेशी) कसा हल्ला करतो, जे संसर्गाचा सामना करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. जर उपचार न केले तर एचआयव्हीमुळे अॅीक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स) होऊ शकतो, जो एचआयव्ही संसर्गाचा शेवटचा टप्पा आहे, जिथे रोगप्रतिकारक शक्ती गंभीरपणे खराब होते. याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 
 एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र सल्लागार पूजा खंबायत यांनी निरोगी आरोग्यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे, एचआयव्ही होऊ नये म्हणून कशी सावधगिरी कशी बाळगली पाहिजे, आपली जबाबदारी! प्रत्येक वेळी शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करावा आणि लैंगिक आजारांपासून स्वतःला वाचवा. एचआयव्ही/एड्स असलेल्या लोकांमध्ये असलेले भेदभाव आणि तो कसा थांबवावा, त्याबद्दलचे गैरसमज कसे दूर केले पाहिजे तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यावर उपचार कशा पद्धतीने घ्यावे या विषयी मार्गदर्शन केले.
 महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरूमठ , शैक्षणिक प्रभारी डॉ. शैलजा हारुगडे, अँटी रॅगिंग समन्वयक डॉ. अनंत शेरखाने,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नम्रता वाघमोडे आदी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाला सुमारे ४८ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. पूर्वा वानखेडे हिने केले तर आभार सुमित पाटील याने मानले. या कार्यक्रमासाठी विद्या प्रतिष्ठानच्या सर्व मॅनेजमेंट कमिटीचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

फोटो ओळ: 
जैव तंत्रज्ञान महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन करताना मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment